सोलापूर - मोहोळ - कुरुल - मंद्रूप - बसवनगर - वळसंग - तांदूळवाडी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सहकारमंत्री देशमुख यांनी दक्षिण सोलापुरातून शहर व ग्रामीण भागाला जोडणार्या मुख्य रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मोहोळपासून निघणारा राष्ट्रीय महामार्ग 65 पासून पुढे कुरुल - मंद्रूप - बसवनगर - वळसंग - तांदूळवाडी मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 465 देण्यात आलेला आहे. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्त्यासह अणदूर - नळदुर्ग - हन्नूर ते अक्कलकोटला जोडणार्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग 652 क्रमांक देण्यात आलेला आहे. तुळजापूर रस्त्याला जोडणार तुळजापूर रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्ग 66 ला हा नवीन राष्ट्रीय महामार्ग जोडला जाणार आहे. या निर्णयामुळे वाहतूक दळण - वळण व्यवस्था सुखकर होणार आहे. सध्या तालुक्यात रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत. सोलापूर-विजापूर महामार्गासह या महामार्गामुळे परिसरातील विकासाला गती येणार आहे.
मोहोळ-मंद्रूप-तांदूळवाडी रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:59
Rating: 5