Breaking News

राजकीय जोडे बाजूला ठेवून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे

राहुरी / ता. प्रतिनिधी । 06 ःराहुरी तालुक्याला मैदानी खेळाचा मोठा वारसा असुन हा वारसा जपण्यासाठी सर्वांनी राजकिय जोडे बाजुला ठेवुन खेळ व खेळाडुंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत राहुरी तालुका आय काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांनी व्यक्त केले. राहुरी व्हॉलीबॉल क्लबच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय व्हालीबॉल स्पर्धेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे विरोधी गट नेते दादासाहेब सोनवणे होते.


प्रास्ताविक जयप्रकाश गायकवाड यांनी करून सर्वांचे स्वागत केले. मा. उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मैदानी खेळामुळे शारिरीक, मानसिक व बौध्दिक विकास होतो.व्यायामाने शरिर सदृढ बनते, माञ अलीकडील काळात मैदानी खेळ अस्तीत्व गमावत चालले असुन, नगरपरिषदेने खेळासाठी मैदाने उपलब्ध्द करून देण्याची गरज आहे. यावेळी दादा पाटील सोनवणे, माजी नगरसेवक डॉ. धनंजय मेहञे, नितीन तनपुर, ज्ञानेश्‍वर पोपळघट आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नगरसेवक अण्णासाहेब शेटे, सोन्याबापु जगधने, बिलाल शेख, गणेश खैरे, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, प्रा. शाकिर सय्यद, ऋषिकेश तनपुरे, पञकार मुख्तार सय्यद आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. सुञसंचालन अफरोज खान यांनी तर आभार प्रशांत आव्हाड यांनी व्यक्त केले. स्पर्धेस नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी भेट देवून राज्यभरातुन आलेल्या संघांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुरी व्हालीबॉल क्लबचे हाजी समिर शेख, रवि सोनार, मयुर काळे, शंकर गुलदगड, एजाज पठाण, साजीद शेख, विकी तनपुरे, अबरार सय्यद, अबुतलाह मुसानी, आर. आर. तनपुरे मिञमंडळ आदीं प्रयत्नशिल आहेत.