Breaking News

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राहुरीत एकदिवसीय धरणे आंदोलन

बहुजन क्रांती मोर्चा राहुरी तालुक्याच्या वतीने भिमा-कोरेगाव दंगल घडविणार्‍या एकबोटे-भिडे-दवे यांना तात्काळ अटक करावी आणि आंदोलन करणार्‍यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.


1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे हिंसा घडविणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करावी, अमानवीय पद्धतीने व गैर संविधानिक पद्धतीने कोंबिंग ऑपरेशन करून निरापधार लोकांना पोलिसांद्वारे अटक करणे, पोलीस प्रशासन राज्यशासनामार्फत मानवी अधिकाराचे उल्लंघन करण्याच्या विरोधात स. 11 ते सायंकाळी 5 वा. पर्यंत तहसील कार्यालय राहुरी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मिलिंद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि आनंद दवे यांनी व यांच्या इशार्‍यावरून भीमा कोरेगाव येथे जी हिंसा घडवून महाराष्ट्रासह देशात अशांतता निर्माण केली, त्यांना त्वरित अटक करावी, कोंबिंग ऑपरेशन करून निरापधार लोकांना अटक करून व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, या राज्यशासन व पोलीस प्रशासनाचे जे धोरण आहे, त्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तीव्र निषेध करून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये राहुरी तालुक्यातील सर्व पुरोगामी संघटना आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. यावेळी शिरीष गायकवाड, संजय संसारे, बाळासाहेब जाधव, संतोष वाघमारे, डाँ. रमेश गायकवाड, अब्दुल आतार, डाँ. जालिंदर घिगे, कांतिलाल जगधने, संदिप पाळंदे, बाबुराव मकासरे, राजु खोजे, मनोज हासे, सुनिल तांबे, मच्छिंद्र गुंड, विकास बोरूडे, विजय भोसले, प्रकाश ओहोळ, विश्‍वास जगधने, संदिप कोकाटे, शशिकांत विधाते, पप्पू कुसळकर, सुभाष पवार, सचिन गायकवाड सह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.