Breaking News

अग्रलेख - विरोधकांची हतबलता...

लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवणार नसते तर नवलच. मात्र विरोधकांच्या टीकेला भीक न घालता, त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे न देता, उलट त्यांच्याच पक्षाची ध्येयधोरण आणि मागील राजवटीवर टीका करत, विरोधकांचा हल्ला सहज परतवून सहीसलामत सुटणारे म्हणून नरेंद्र मोदी यांचा आवुर्जन उल्लेख करावा लागेल. राफेल विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, त्यामुळे संसदेत या घटनांचे पडसाद उमटतील, अशी अपेक्षा होती. कारण 36 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रश्‍न सोमवारी संसदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये या विमानांबाबत महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसारच मी या विमानांच्या किंमतीबाबत काहीही बोलू शकत नाही. 

गोपनियता पाळण्यासाठीच हा व्यवहार किती रुपयांचा झाला हे सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. संरक्षणमंत्र्याच्या या चुप्पीमुळे लोकसभेत सरकारला विरोधक धारेवर धरतील, अशी अपेक्षा होती. राफेल संदर्भात थेट पंतप्रधान मोदी यांच्यवर टीका केल्यामुळे विरोधक आक्रमक होऊन पंतप्रधान मोदी यांना जेरीस आणतील अशी शक्यता होती. मात्र मोदी यांंनी आपल्या भाषणात राफे ल बद्दल उल्लेख देखील करता, चर्चेचा रोखच काँगे्रसच्या घराणेशाहीकडे नेत, विरोधकांवर टीकेचा भडीमार केला. विरोधकांकडून 15 लाखांच्या घोषणेचे काय काय? अशी घोषणाबाजीस सुरूवात केली. मात्र पंतप्रधांनानी विरोधक माझा आवाज दाबू शकत नाही, असे म्हणत त्यातील हवाच काढून घेतली. वास्तविक या घटनेवरून अनेक बाबाी समोर येतात, ज्याचा अभ्यास करण्यास विरोधक कमी पडले. पंतप्रधान मोदी यांच्या मानसिकतेचा अभ्यास न करता, त्यांच्या टीका करण्याचा पध्दतीचा अभ्यास न केल्यामुळे विरोधक ांचा पंतप्रधानांसमोर नामोहरम होतांना दिसून येत आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे मोदी व्यथित होत नाही. याउलट ते विरोधकांवर आसूड ओढत, त्यांच्या टीकेतील हवा क ाढून घेतात. विकासाचे तकलादू तुणतुणे वाजवत, इतिहासाचा विपर्यास करीत, आपल्या ‘अगाध’ ज्ञानाचे प्रदर्शन करत व काँग्रेस पक्षाच्या कारकीर्दीतील भ्रष्टाचारावर बेलगाम आरोप मोदी करत सुटले आहेत. मात्र मोदी यांच्या भाषणात आत्मस्तुती, प्रौढी, दिशाभूलपणा आणि खोटेपणा ओतप्रोत भरलेला असतो. अर्थातच मोदी यांच्या कारभारावर टीका क रण्याची, उणिवा काढण्याची, एकचालुकानुवर्तीत कारभाराला लक्ष्य करण्याची नामी संधी विरोधकांकडे आहे. 

मात्र प्रभावी नेतृत्व आणि वक्तृत्वाअभावी मोदी यांच्यावर टीकेची धार टोकदार करता येत नाही. मुख्यत: ज्या पक्षाला जसे नेतृत्व लाभेल तसे पक्षातील नेते काम करत असतात. नेतृत्व ते करून घेत असते. याउलट जर नेतृत्व सुस्तावले, ढेपाळले तर पक्षाची काय वाताहत होते, याचा अनुभव 2014 मध्ये अनेक राजकीय पक्षांनी घेतलाच आहे. योग्यवेळी योग्य नेतृत्वाचा विकास केला नाही तर पक्ष इतिहासजमा होतो, याचे विस्मरण होता कामा नये. पक्षनेतृत्वाने नेहमी सजग राहत बदल चाणाक्ष नजरेने हेरता आला पाहिजे. खासदारकींचा अनुभव नसलेले आणी दिल्लीच्या राजकारणांत उठबस नसतांना देखील दिल्लीच्या राजकारणात मोदी आणि शहा या जोडागोळीने प्रवेश केला. मात्र या जोडगोळीने अंवलंबलेल्या रणनितीचा भल्याभल्यांना अंदाज आला नाही. काहीसा तसाच अंदाज अनेकांना मोदी यांच्या भाषणांचा येत नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला नंतर महत्व उरत नाही, तसाच काहीसा लोकसभेतील प्रकार म्हणावा लागेल.