बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कारवाईची मागणी
नेवासा येथील श्रीरामपूर रोडवरील खोलेश्वर गणपती मंदिरापासून प्रांतिक तैलिक महासभेचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुकमोर्चाने पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविणचंद लोखंडे व तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कारवाई करून गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात येऊन चौकशी करण्यात यावी, पोसो कायद्याच्या अंतर्गत विशेष अधिकारी नेमून गुन्ह्याचा तपास करण्यात यावा, शासकीय धोरणाप्रमाणे अत्याचारित पीडित मुलीला तातडीने मदत करण्यात यावी, पीडित मुलीच्या पालकांवर दबाव टाकणाऱ्या शिक्षण संस्थेचे चालक व विद्यालयाच्या प्रमुख कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
