Breaking News

जिल्हा कृषि महोत्सवानिमित्त रॅलीचे आयोजन


नाशिक ;- कृषि विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकर्‍यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान तसेच योजनांची माहिती पोहचविण्यासाठी जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे 21 ते 25 फेब्रुवारी या क ालावधीत आयोजन करण्यात आले असून महोत्सवाची माहिती देण्यसासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उप विभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, विभागीय जिल्हा अधिक्षक मोहन वाघ, उपसंचालक कैलास शिरसाठ, प्रमोद वानखेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आदी उपस्थित होते.
या प्रचार रॅलीची सुरूवात, आत्मा कार्यालय, उंटवाडी येथे झाली. त्रिमुर्ती चौक, पवन नगर, उत्तम नगर, अंबड पोलीस स्टेशन, स्टेट बँक ऑॅफ इंडिया, जुने सिडको, मुंबई नाका, जुना आग्रारोड, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, गंगापुरनाका, जेहान सर्कल, एबीपी सर्कल, सिटी सेंटर मॉलमार्गे आत्मा कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.