Breaking News

महाराष्ट्रात चार वर्षात 465 कोटींची कामे

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून गेल्या चार वर्षात 465 कोटी 26 लाख रुपये विविध विकास कामांवर खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा खासदारांना प्रतिवर्षी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या मतदार संघातील विविध विकास कामे करण्यासाठी दिला जातो. 


सन 2014-15 ते जानेवारी 2018 या काळात राज्याला 610 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे, यापैकी 465 कोटी 26 लाख रुपये प्रत्यक्ष खर्च करण्यात आले आहेत. खर्चाची ही टक्केवारी 76.27 टक्के इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात 17.5 कोटी रुपयांचा निधी डिसेंबर अखेर राज्याला मिळाला आहे, मार्च 2018 पर्यंत उर्वरित निधी देण्यात येतो. सन 2014-15 याकाळात राज्याला 240 कोटी रुपये मिळाले. 2015-16 या वर्षात 227 कोटी 5 लाख, 2016 - 17 या काळात 125 कोटी असे एकूण 610 कोटी रुपयांचा खासदार निधी महाराष्ट्राला मिळाला आहे.