सोलापूर : राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेंच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी पुन्हा एकदा रोषाला सामोरे जावे लागले. सदाभाऊ कु र्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. क ाही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौर्यावेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या क ार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्या धास्तीने सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. आजही अशाच प्रकारे पंढरपूर दौर्यावेळी सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. कुर्डुवाडीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यक र्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच, त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीसमोर गाजरे फेकली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचे नुकसान झाले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संघटक महावीर सावळे, सिध्देश्वर घुगे, बापू गायकवाड, सत्यवान गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे.
सदाभाऊंना ‘स्वाभिमानी’ तडाखा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:44
Rating: 5