Breaking News

ओरिएंटल 389 तर महाराष्ट्र बँकेत 9.5 कोटींचा गंडा


मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळयानंतर बँकेतील घोटाळे समोर येण्याची मालिकाच सुरू झाली असून, शनिवारी दिल्लीत द्वारकादास शेठ प्रायव्हेट लिमिटेडने ओरिएंटल बँक आ ॅफ कॉमर्सला 389 कोटींचा घोळ केला, तर दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्रानेही कर्ज थकवणार्‍या चार उद्योजकांविरोधात सीबीआयकडे तक्रार केली. बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. बँक ऑफ महाराष्ट्रने दिल्लीतील उद्योजक अमित सिंगलाविरोधात तक्रार दिली. तक्रारीनुसार, सिंगलाची कंपनी ‘आशीर्वाद चेन’ने बँक ऑफ महाराष्ट ्राकडून 9.5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, जे आतापर्यंत परत केलेले नाही. या तक्रारीत अमित सिंगलासह त्याचे वडील रोशनलाल आणि आई सुमित्रा देवी यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सला 389 कोटींचा चुना लावला. याप्रकरणी सीबीआयने हिरा व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे संचालक सभ्य शेठ, रीता शेठ, कृष्णकुमार सिंह, रवी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीचे संचालक सध्या दुबईत आहेत. 2007 ते 2012 याकाळात कं पनीने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सकडून 389 कोटींचे कर्ज घेतले. विशेष म्हणजे पीएनबी घोटाळ्याप्रमाणे इथेही लेटर ऑफ अंडरटेकिंग अर्थात एलओयूद्वारे कर्ज देण्यात आले. त्याची परतफेडच केली नाही. 6 महिन्यांपूर्वी याप्रकरणी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने सीबीआयकडे तक्रार दिली होती. दरम्यान आरोपी दुबईत लपल्याची शक्यता असून लूकआऊ ट नोटीस जारी केल्याची माहिती आहे.