कुकाणे प्रतिनिधी ;- नेवासा तालुक्यातील कुकाणे येथील साबांच्या {गट नं १४३} जमिनीवरील अतिक्रमण सोडून भलतेच् अतिक्रमण काढण्याचा प्रकार येतेच नुकताच घडला आहे. या जागेवरील अतिक्रमण काढून हे क्षेत्र मोकळे करावे, यासाठी कुकाणे येथील एकनाथ कचरे यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळात दोन वर्षांपासून खंडपीठाने या जागेवरील अतिक्रमण काढून हा भूखंड रिकामा करावा, असे आदेश दिले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल केली. यासाठी घाईघाईत भलत्याच जागेवरचे अतिक्रमण काढण्याचा प्रताप स्थानिक प्रशासनाने केल्याचा आरोप होत आहे. या कारवाईत मोजणी अधिकार्यांवर संशयाची सुई फिरत आहे. या अधिकाऱ्यांनी मोठ्या स्वरुपात ‘आर्थिक’ तडजोड केल्याची चर्चा कुकण्यात रंगली आहे.