Breaking News

महिलांचा सन्मान व्हावा : प्रा. पाटील

नेवासा ता. प्रतिनिधी ;- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रासेयो अधिक फायदेशीर आहे. यातून होणाऱ्या वैयक्तिक विकासाबरोबरच याचा उपयोग समाजासाठी होणे आवश्यक आहे. फक्त समाजसेवा न करता समाजातील गरीब वर्ग, माता-पिता, महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे, अशी अपेक्षा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम समन्वयक प्रा.शरद पाटील यांनी व्यक्त केली.


मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन मौजे मोरयाचिंचोरे मोठ्या उत्साहात झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे होते. प्रारंभी रासेयो कार्यक्रम समन्वयक प्रा.संदीप तांबे यांनी प्रास्ताविक केले. या शिबिराचा समारोप नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेवटी अमोलिका गागरे हिने अभार मानले.