Breaking News

कन्या विद्यामंदीरचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण


कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. सो.ना. सोनमाळी कन्या विद्यामंदीरचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील अनेक नामवंत व्यक्ती व महिला पालक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनानिमित्त सोनमाळी कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींचा सुश्राव्य गीतगायन व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण पध्दतीने साकार करण्यात आला. विविध भक्तीगीते, लोकप्रिय लोकगीते, लावणी आदी गीतांचे कलात्मक सादरीकरण येथील कलाकारांनी केले. खदखदून हसायला लावणारे विद्यार्थिनींचे सूत्र संचालन ते आपल्या कसदार अभिनयाने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारे सादरीकरण यामुळे उपस्थित श्रोतृवर्ग भारावून गेला होता. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी लोंढे, पर्यवेक्षक वसंत चटाले यांसह सर्व सेवक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.