Breaking News

मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर


पारनेर/ प्रतिनिधी/- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील हरेश्वर विद्यालयात जनसेवा फौंडेशन व डॉ .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पीटल व मेडिकल कॉलेज विळद घाट (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर बुधवार ता .७ फेबुवारी रोजी आयोजीत केले आहे. अशी माहीती डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पीटलच्या वतीने देण्यात आली आहे .
या शिबीरात विविध प्रकारच्या आजाराचे निदान करून उपचार केले जातील. गरज पडल्यास रूग्णाना हॉस्पीटल मध्ये भरती केले जाईल . भरती झालेल्या रुग्णाची सोनोग्राफी , ईसीजी, एक्स-रे, रक्ताच्या काही तपासण्या मोफत केल्या जातील. अॅन्जीओग्राफी , श्रवणयंत्र प्रसुतीपुर्व, व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत केली जाईल .औषध व शस्त्रक्रिया साहीत्यावर वीस टक्के, तर सिटी स्कॅन व एमआर आय सुविधा मध्ये पंचवीस टक्के सुट देण्यात येईल . तरी गरजू रुग्णानी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जनसेवा फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.