Breaking News

कुकडीचे आवर्तन दोन दिवसात: माजी मंत्री पाचपुते


श्रीगोंदा/प्रतिनिधी/ - कुकडीच्या आवर्तनाची सुरुवात दोन दिवसात होणार असून आपण मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री व पालकमंत्री यांना भेटून घोड व कुकडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेत आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली. 
सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, बदलत्या हवामानामुळे पाणी पातळीत घट होत चालली असल्यामुळे कुकडीचे आवर्तन तातडीने सोडणे गरजेचे होते. म्हणून मागील आठवड्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री प्रा राम शिंदे यांना भेटून घोड व कुकडी,विसापूरचे आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी केली होती. त्यानुसार घोडचे आवर्तन सुरु झाले आहे. त्याचबरोबर कुकडीचे आवर्तन हि दोन दिवसात सोडण्याचा निर्णय झाला आहे. तसेच विसापूरचे आवर्तन देखील लवकरच सुटणार आहे 

पाण्याचा योग्य वापर करावा - 

कुकडीचे आवर्तन दोन दिवसात चालू होणार असून पुढेही ज्यावेळी तीव्र उन्हाळा जाणवेल त्यावेळी कुकडी मधून दोन आवर्तने करायची असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. असे आवाहन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.