Breaking News

मिलिंद एकबोटेला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता !

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हा नोंद असलेले मिलिंद एकबोटेची अटकपूर्व जामिनीची याचिका फेटाळल्यामुळे एकबोटेला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामिन याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली. 


न्या. भूषण गवई आणि बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठानं याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर न्या. एस सी धर्माधिकारी आणि न्या. आरती डांगरे यांच्या खंडपीठाक डे याचिका सादर करण्यात आली होती. ज्या दिवशी हिंसाचार घटला त्यादिवशी आपण तिथे नव्हतो, माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मी कोणताही बैठक आयोजित केली नाही. माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय असा युक्तीवाद एकबोटेंच्या वकिलांनी केला.


मात्र सरकारी वकिलांनी एकबोटेंचे दावे फोल ठरवले. ज्या सभेला आपण हजर नाही त्या सभेला हजर असणार्‍यांचे जबाब आहेत. एकबोटेंनी घटनेच्या दरम्यान काही लोकांना कॉल केल्याचे डिटेल्स आहेत. आणि हिंसाचाराच्या घटनेत 9 कोटी 69 लाखाच्या मालमत्तेचं नुकसान झालं अशी माहिती सरकारी वकिलांनी मांडली. खंडपीठाने दोन्हीक डील युक्तीवाद ऐकून एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता एकबोटेंना अटक अटळ असून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.