Breaking News

मुंबई महापालिकेचा 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : मुंबई महापालिकेचा 2018-19 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. आज 27 हजार 258 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यात विद्यमान करांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. तसेच कोणतेही नविन कर प्रस्तावित केलेले नाहीत. 


महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कोस्टल रोडसाठी 1500 कोटी, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 100 कोटी, रस्त्यांसाठी 2058 कोटी, नविन पूल बांधणीसाठी 467 कोटी, 1450 मँनहोलवर जाळ्या बसविण्यासाठी 1.22 कोटींची तरतूद, 55 ठिकाणच्या पूर प्रवण स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 53.71 कोटींची तरतूद, मिठी नदी सुधारणेसाठी 15 कोटी, कोणतीही करवाढ नसली तरी पालिका रूग्णालयातील शुल्कात वाढ होणार आहे. दरम्यान, कारखाना परवाना शुल्क, घाऊक बाजार शुल्क वाढणार, देवनार डंपिंग ग्राऊंड इथं कच-यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 110 कोटींची तरतूद, मुलुंड डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 65 कोटींची तरतूद, उद्यान विभागासाठी 243 कोटींची तरतूद, तानसा पाईपलाईन शेजारील सायकल ट्रॅकसाठी 100 कोटींची तरतूद, मल नि:सारण सुधारणांसाठी 119 कोटींची तरतूद, रस्त्यांसाठी 2058 कोटींची तरतूद असून त्यातील सिमेंट रस्त्यांसाठी 434 कोटी तर डांबरी रस्त्यांसाठी 590 कोटींची तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहे.