Breaking News

पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

पुणे, - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सुचविलेली पाणीपट्टी दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली पालिकेकडे आहे.याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे हापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहे. सर्वंच बाबीत नाग रिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. त्यात आता पालिका पाणीपट्टी देखील वाढविणार आहे. यामुळे नागरिकांची धास्ती वाढली आहे.


सत्ताधा-यांनी कोट्यवधी रुपये वाचविले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाणीपट्टी दरवाढ न करता. वाचविलेल्या पैशांचा वापर पाणीपुरवठ्यासाठी करावा. त्यामुळे प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ रद्द करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने निवदेनातून केली आहे. पाणीपट्टीत वाढ केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.