Breaking News

शिक्षक संघटनेच्या एकदिवसीय संपास उस्फूर्त प्रतिसाद


कोपरगाव ता. प्रतिनिधी  कनिष्ठ महावद्यालयीन शिक्षकांच्या अनेक दिवसांपासून महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. मात्र शासन केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांनी अध्यापनाचे काम बंद ठेवून आपआपल्या काॅलेजच्या गेटसमोर धरणे धरली. या एकदिवसीय संपास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संपात एस. एस. जी. एम. काॅलेज, के. जे. सोमय्या, के. बी. रोहमारे काॅलेज, ग. र. औताडे महाविद्यालय, पोहेगाव, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, राधाबाई काळे ज्यु. काॅलेज कोळपेवाडी आदी ठिकाणच्या शिक्षकांनी संप यशस्वी केला. डाॅ. सुरेश काळे, प्रा. कमलाकर शिदे, राजेंद्र सोनवणे, संजय शिंदे, बाबासाहेब वाघ, शाम जगताप, अविनाश झावरे, नवनाथ पवार, ज्ञानेश्वर पुंड, श्रीमती योजना पोतदार आदींनी संप यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.