Breaking News

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ‘ध्रुव’चे सुयश


जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव अकॅडेमीने १५ सुवर्ण पदकांसह ४० पदकांची लयलूट केली. जिल्हा जलतरण संघटना व क्रीडा भारती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ही स्पर्धा अहमदनगर येथील वाडियापार्क जलतरण तलावात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ३५ शाळांचे ३९७ जलतरणपटू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत ८ वर्षांखालील गटात ध्रुवच्या साईश गोपाल सूर्यवंशीने ( १ सुवर्ण व १ कांस्य), पलश अमित शिंदे (२ रौप्य), वरदराज सतिष गुंजाळ (१ सुवर्ण व १ रौप्य), गार्गी संजय विखे हिने (१ सुवर्ण व १ कांस्य) तर, दहा वर्षांखालील गटात आदित्य प्रमोद राजूस्कर, ध्रुव मिलींद पलोड, सिध्दार्थ रोहित जोर्वेकर, प्रिती बाबासाहेब बिबवे, अदिती हेमंतकुमार मोरे, स्वरांजली सचिन शार्दूल आदींनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. 

क्रीडा भारतीचे अध्यक्ष निर्मल थोरात, अमोल धोपावकर, जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव डॉ. विश्वजित चव्हाण, रावसाहेब बाबर आदींच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गोपाल सूर्यवंशी यांनी ध्रुवच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘ध्रुव’चे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागाचे प्रमुख गिरीश टोकसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.