Breaking News

‘डान्स कोपरगाव डान्स’वर थिरकली तरुणाई ‘बिजनेस एक्स्पो’ उत्साहात


कोपरगाव येथे लायन्स, लायनेस व लिओ क्लबच्यावतीने आयोजित ‘बिजनेस एक्स्पो’ या व्यावसायिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी खास महिलांसाठी ‘झिंग झिंग झिंगाट’ या मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैशाली परजणे, शिर्डी साईनाथ हॉस्पिटलच्या मेडिकल अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरी आदी उपस्थित होत्या. ‘डान्स कोपरगाव डान्स’ ही नृत्य स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत कोपरगावमधील विविध विद्यालये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार दाखविला. या माध्यमातून येथील तरुणाईने चांगलाच ठेका धरला. 
यावेळी प्रियदर्शनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली कोल्हे, काका कोयटे, पत्रकार सुधीर लंके आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी खास महिलांसाठी सौंदर्य प्रसाधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नेहा समर यांनी महिलांना सौंदर्यबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, सुहासिनी कोयटे, लायनेस डॉ. वर्षा झंवर आदी उपस्थित होत्या. सायंकाळी तुलसीदास खुबानी प्रस्तुत कोपरगाव ‘गॉट ट्यालेंट’मध्ये विद्यालय, महाविद्यालय व खुल्या वर्गात विविध ट्यालेंट स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये गायन, अभिनय, काव्य वाचन, कराटे, योगा, मल्लखांब, मिमिक्री, वादन या कलांमध्ये खालसा ग्रुपने चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यावेळी तुलसीदास खुबानी, रिंकेश खुबानी, तरुण खुबानी, राजेश परजणे, सिमरन खुबानी, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बनसोडे यांनी केले. अक्षय गिरमे यांनी आभार मानलेे.