Breaking News

कोेपरगांवात महाशिवरात्रीची तयारी सुरू


कोेपरगांव : तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण हेमाडपंथी महादेव मंदिर तीन खणी रामदासी बाबा स्थान विभांडक ऋशी आश्रम, संवत्सर येथील शृंगेश्वर मंदिर त्र्यबंकेश्वर कोपरगांव बेट भागातील कचेश्वर गुरू शुक्राचार्य श्रीक्षेत्र मंजूर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम श्री कशी विश्वनाथ महादेव मंदिर, सुरेगांव येथील सिध्देश्वर महादेव मंदिर कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर, कोपरगांव सराफ बाजारातील महादेव मंदिर दत्तपार स्वामी समर्थ मंदिर, श्रीक्षेत्र पुणतांबा आदी महाशिवरात्र पर्वकालानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची सर्व तयारी सुरू आहे. कोपरगाव बाजारतळ परिसरात महाशिवरात्र जत्रा भरविली जात आहे. पाळणे विविध खेळण्यांचे स्टाॅल लावण्यांची लगबग सध्या सुरू आहे. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी नदीकाठी यात्रा भरली जाते. चालू वर्षी पर्जन्यमान चांगल्या प्रमाणात झाले. गोदावरी नदीवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे अडविण्यात आले होते. त्यात ब-यापैकी पाणीही साठले होते. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे ते काही प्रमाणात कमी झाले आहे. महाशिवरात्रीला गोदास्नानाला विशेष महत्व आहे. या सोहळयाचा रूद्रयागाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.