कोेपरगांव : येथील शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी संभाजीराव गावंड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोपरगांव सहनिबंधक आर. एल. त्रिभुवन यांनी काम पाहिले. गावंड यांच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष वाल्मिक भास्कर यांनी मांडली. संचालक विजय रोहोम यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सोपानराव पानगव्हाणे, माजी अध्यक्ष अंबादास देवकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी आभार मानले. सूत्रसंचलन व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी केले.
शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी संभाजीराव गावंड
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:15
Rating: 5