Breaking News

बीफ मार्केटमध्ये आढळली गोवंश कातडी


श्रीरामपूर / प्रतिनिधी :- शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमधील बीफ मार्केटजवळ बुधवारी {दि. ३१} गोवंश जनावरांची कातडी आढळून आली. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गोवंश कातडीचे काळे, तांबडे, पांढरे चट्टेपट्टे असलेले १० नग जप्त केले. या सर्व मुद्देमालाची किमंत १९ हजार २०० रुपये आहे. याप्रकरणी पोलिस नाईक जोसेफ साळवी यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार जमील शरीफ कुरेशी, इमरान उर्फ मुन्ना युसूफ कुरेशी, अब्दुल करीम शेखलाल चौधरी {सर्व रा. वॉर्ड नंबर २, श्रीरामपूर} यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेड. कॉ. हापसे हे करत आहेत.