व्हीआयपीं’च्या मागेपुढे करणार्या कर्मचार्यांना झटका! दंडात्मक कारवाईचे दिले संकेत
‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणार्या आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणार्या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत सर्वसामान्यांबरोबर विविध राज्यातून व देशभरासह वर्षभरात जवळपास 3 कोटी भाविक येत असतात. यात राजकीय पदाधिकारी, सिनेअभिनेते आणि वेगवेगळ्या विभागाचे वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश असतो. अशावेळी या सर्वांच्या मागेपुढे करण्याचा त्याचप्रमाणे संबंधितांचा परस्पर सत्कार करण्यासाठी धडपडत असलेल्या साई संस्थांच्या कर्मचार्यांना ‘झटका’ देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
साईदर्शनासाठी मंदिरात येत असलेल्या या ‘व्हीआयपी’ भक्तांचा साईबाबा संस्थानकडून गंध तीर्थ उदी व शाल देऊन सन्मानाने सत्कार केला जातो. मात्र सूचना किंवा खास आदेश नसतानादेखील मंदिरात काही कर्मचारी संबंधित साईभक्तांच्या मागं ए पुढे करतात. कधी कधी तर त्यांचा परस्पर सत्कार केला जातो. अशा प्रकारांना पायबंध घाण्यासाठी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी कडक उपाययोजना राबविण्याचा निर्धार केला आहे. जर कोणी कर्मचार्याने नियम बाह्य सत्कार किंवा व ओळखीच्या साईभक्तांना मानसन्मान देण्याचा प्रयत्न केला तर अशा कामगाराची माहिती मंदिर विभागाने लेखी स्वरुपात माहिती द्यावी. त्या कर्मचार्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश गुप्ता यांनी दिले आहेत. या आदेशाच्या झेरॉक्स प्रती विविध विभागात कामगारांच्या सह्या घेण्यासाठी पाठविण्यात आल्या. त्यामुळे जवळपास 6 हजार 200 साईबाबा संस्थानच्या सेवेत सेवा देणार्या कायम कंत्राटी व आऊट सोर्सिंगच्या कामगारात मोठी खळबळ उडाली आहे.
यसाई संस्थानने पहिल्यांदाच कामगारांच्याबाबत कठोर धोरण स्वीकारल्यामुळे कामगारात शिस्त लावण्यासाठी घेतलेला हा मोठा निर्णय मानावा लागेल. जनसंपर्क कार्यालयामार्फत मंदिर विभागाला सूचना दिल्यानंतर त्या भक्ताचा संस्थानकडून सत्कार केला जातो. मात्र गेल्या काही दिवसात साईमंदिरात येणारे भक्त व त्यांचे सत्कार परस्पर मोठ्या प्रमाणावर होत सत्कार घेणारा आणि करणारा याची माहिती जनसंपर्क कार्यालयाला दिली जात नव्हती. अशा वेळी संबंधित कोणाची नाराजी नको, म्हणून सत्कारही केले जात. मात्र समाधीसमोर उभे राहणे, आरतीच्या वेळी पुढे उभे राहणे तर कधी सत्कार यामुळे वादावादीचे प्रसंग निर्माण झाले होते. या सर्व प्रकारात इतरांबरोबर काही कामगार ही सहभागी होते. मात्र या सर्वांची नाराजी घेण्याची जबाबदारी याविभागात काम करणार्या कर्मचार्यांवर येत असे. या नाराजीचा फटका कधी कधी थेट बदलीच्या रुपातही मिळत असे. त्यामुळे नाराजी नको म्हणून असे सत्कार व प्रकार वाढत होते. अखेर कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी थेट लेखी पत्र जारी केले. जर कायम कामगार व इतर कंत्राटी कामगार यांनी त्यांच्या नातेवाईक, पाहुणे, ओळखीचे साईभक्त यांना सत्कार यासाठी आग्रह धरला तर थेट अशा कामगाराची माहिती मंदिर विभागाने संस्थानकडे द्यावी, असे पत्र मंदिर विभागासह सर्वच विभागांना देण्यात आले आहे. या पत्राचा संस्थानमध्ये काम करणार्या कायम 2 हजार 39 कर्मचारी, कंत्राटी पद्धतीने 2 हजार 670 आणि आउट सोर्सिंगच्या 1 हजार 633 कामगारांनी चांगलाच धसका घेतला आहे.