नोकरीचे बनावट आदेश प्रकरणी विस्तार अधिकारी संतोष जगताप निलंबित
बीड : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत व एका बेरोजगारास बनावट आदेश देणार्या विस्तार अधिकाजयास अखेर मंगळवारी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांनी निलंबित केले. संतोष दिलीप जगताप असे निलंबित विस्तार अधिकार्याचे नाव आहे. तो सध्या आरोग्य विभागात कार्यरत आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये पोलीस अधीक्षकांना एका निनावी पत्र पाठवून फसवणूक झालेल्या बेरोजगाराने संतोष जगतापचा भांडाफोड केला होता. उपअधीक्षक (गृह) बी. ए. सावंत यांच्याकडे हा अर्ज चौकशीसाठी अधीक्षकांनी सोपविला होता. सावंत यांनी सीईओंना दोनदा पत्र लिहून संतोष जगतापला चौकशीसाठी पाठविण्यास सूचविले होते; परंतु जगताप चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ करत होता.
2 फेब्रुवारी रोजी जनाबाई होडशिळ, कुंडलिक राऊत, मंगल आगळे, मेघना हरेल या चार बेरोजगारांनी जिल्हा परिषदेला निवेदन देऊन संतोष जगतापवर कारवाई करावी अन्यथा 26 फेबु्रवारीपासून उपोषण करण्याची परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन सादर केले होते. ‘क्लिक टू न्यूज’ने हे प्रकरण उचलल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने 3 फेबु्रवारी रोजी जगतापला निलंबनाची नोटीस बजावली होती. सोमवारी त्याने जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार यांना खुलासा सादर केला. मंगळवारी पवार यांनी हा अहवाल सीईओंना सादर केला. त्यानुसार सीईओ नीला यांनी जगताप यास नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली निलंबित केले. त्यास परळी पंचायत समिती मुख्यालय दिले आहे.
संतोष जगतापने मंगल आगळे यांना भूकंप व आपत्ती निवारण विभाग मंत्रालय मुंबई या विभागाच्या नावाने परिचर पदाचा बनावट आदेश दिला होता. शिवाय बेरोजगारांकडून पैशासाठी तगादा सुरु झाल्याने बनावट स्वाक्षरीचे धनादेशही दिले होते. जि.प. प्रशासनाने मंगळवारी संतोष जगतापवर निलंबनाची कारवाई करुन विभागीय चौकशी प्रस्तावित केली असली तरी त्याने दिलेल्या बनावट आदेशानुसार केलेल्या कारवाईचा अहवाल राज्याच्या भूकंप व आपत्ती निवारण विभागालाही पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, जगतापसोबत अन्य दोघे असल्याचे निनावी पत्रात म्हटले होते. ते दोघे कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. फौजदारी कारवाई झाल्यानंतरच त्या दोघांचा छडा लागेल.