सूर्य, चंद्र असेपर्यंत मराठी भाषा लुप्त होणार नाही: डॉ. बबन चौरे
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित जागतिक मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ बबन चौरे बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ सुभाष शेकडे, डॉ. अशोक डोळस, ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, प्रा. दत्तप्रसाद पालवे, प्रा. प्रदीप वारुळकर, प्रा. दिपक पावसे आदी उपस्थित होते.
डॉ. चौरे म्हणाले की, मराठी भाषेचा डंका आज फक्त महाराष्ट्रात वाजत नसून जगातही मराठी भाषा बोलली जाते. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशामध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्र असून त्यावर आजही मराठी कार्यक्रम सादर केले जातात. माझिया मराठीचिये कवतिके, अमृतातेही पैजा जिंके असे सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी ज्या मायबोली मराठीबद्दल संत ज्ञानेश्वर सांगून गेले त्या मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे.
याप्रसंगी किसन सोनवणे, सविता धायतडक, चैताली मरकड, मोनल गारदे, जनार्धन दराडे, उमेश गुजर, डॉ. अशोक कानडे यांनी काव्यवाचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. डॉ सुभाष शेकडे यांनी मराठी भाषेची महती या विषयावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा.आशा पालवे तर आभार डॉ. अशोक डोळस यांनी मानले. याप्रसंगी डॉ. प्रशांत साळवे, प्रा. विजय देशमुख , डॉ.अभिमन्यू ढोरमारे, डॉ. भगवान सांगळे, प्रा. अर्जुन केरकळ, सुरेखा चेमटे, प्रणिता भावसार, मन्सूर शेख, प्रा. डोईफोडे, सुनिता पालवे व विद्यार्थी उपस्थित होते.