Breaking News

न्यू लिटल स्टार चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


कुकाणा/प्रतिनिधी/- कै.संतराम त्रिंबकराव गोरे बहुउद्देशीय संस्था संचलित "न्यू लिटल स्टार "प्री प्रायमरी स्कूलचे चौथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात " आय लव माय इंडिया", "दैवत छत्रपती", मैया यशोदा, गाण वाजु दया, लय भारी, जिनकी है बेट़ीया, अशी अनेक गिते व देशभक्तीपर गीते, लावणी, गवळणी, बालगीते अशा गीतातून उपस्थितांची मने जिंकली. "जिनकी होती है बेटी या " या गीतातून "बेटी बचाओ बेटी पढावो" हा सामाजिक संदेश विद्यार्थ्यांनी दिला. मिकी माऊस व डोरेमॉन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच संगीता गणेशराव गव्हाणे यांचे हस्ते झाले . यावेळी व्यासपिठावर आबासाहेब काळे, गणेशराव गव्हाणे, भाऊराव मुळे, ओमकार शेटे, हरिभाऊ नवले, जाधव, अजित रसाळ, अण्णासाहेब भगत, बाळासाहेब वाघुले, बाळकृष्ण पुरोहित  उपस्थित होते.