छ्त्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानचं कवचकुंडल : शिवशाहीर काळे
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रीपाद छिंदम ने काढलेल्या अपशब्दांची नैतिक जबाबदारी स्विकारुन खासदार दिलीप गांधी व पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी राजीनामे द्यावेत. तसेच शिवजयंतीला हेतुपुरस्सर दांडी मारणाऱ्या, पाथर्डी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांची बदली करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील बोरुडे व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक लक्ष्मण डांगे यांनी २२ फेबुवारीपासून सुरु केलेल्या बैठ्या सत्याग्रहास आपला जाहीर पाठिंबा देताना ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.ऋषीराज टकले, मराठा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पाटील गागरे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, सामाजिक कार्यकर्ते सुंदरमामा कांबळे, राजेंद्र बोरुडे, रासपचे वसंत घोगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड, शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले, शिवचरित्र प्रबोधनकार हमीदभाई सय्यद, पंडीत देवढे, अनिल फुंदे, सुनिल कदम, अविनाश टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील बोरुडे व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक, लक्ष्मण डांगे यांच्या सत्याग्रह सुरु होऊन आज पाच दिवस झाले. या दरम्यान तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांशी दोनदा चर्चा केली परंतु ती निष्फळ ठरल्याने त्यातून काही एक तोडगा निघाला नाही. आंदोलकांच्या मागण्यांपैकी खासदार दिलीप गांधी व पालकमंत्री राम शिंदे यांच्या राजीनाम्यांचा विषय तहसीलदारांच्या अखत्यारित येत नसल्याने या विषयावर ते हतबल आहेत. शिवजयंतीला दांडी मारल्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांच्या बदलीच्या संदर्भात त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे ते सादर करु शकतात. परंतु एवढ्या एकाच विषयावर आंदोलक, आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.