Breaking News

लोणीच्या विद्यार्थ्यांची 'उत्कर्ष'साठी निवड


प्रवरानगर प्रतिनिधी ;- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दि. २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक 'उत्कर्ष' स्पर्धेसाठी लोणी येथील कृषी आणि कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामधील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली. या स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया ठेवण्यात आली होती. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत जवळपास २३ महाविद्यालयांतून ६४ विद्यार्थ्यांनीं सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीमधून बोरसे श्रद्धा हिचा भित्तीचित्र, छायाचित्र आणि संगीत या स्पर्धेसाठी निवड झाली तर कृषी महाविद्यालयातून पंडित तृप्ती हिचा निबंध, संगीत, नृत्य आणि हेमंत धांदले याची कविता, निबंध, स्क्रिप्ट या स्पर्धे मध्ये निवड करण्यात आली.