Breaking News

‘ज्ञानगंगा विद्यानिकेतन’मध्ये शिवजयंती उत्साहात


आश्वी : प्रतिनिधी ;- संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन व अश्विन आयुर्वेद महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी केली. 
यावेळी अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती महोत्सवात लेझीम पथकाच्या निनादात मिरवणूक काढली. छ्त्रपती शिवरायांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनिल चत्तर यांचे शिवचरित्रपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वच जाती धर्माच्या जनतेला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आजही सर्व समाजाने एकसंघ होऊन स्वराज्य आणखी मजबूत व वैभवशाली बनवावे, असे मत चत्तर यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, संचालिका निलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य शिवपाल खंडीझोड, अण्णासाहेब बलमे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, नितीन गिते, प्रदीप जगताप आदी उपस्थित होते. याप्रसंगी वेदश्री भोकरे, पूनम भुसाळ, सृष्टी वाकचौरे, ऋषिकेश काळे, अनिकेत थेटे, प्रणव पांडे आदी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम जाधवर व कल्याणी थिगळे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले.