Breaking News

गृहविज्ञान विभागातर्फे राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन


प्रवरानगर प्रतिनिधी  :- येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गृहविज्ञान आणि संगणकशास्र महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभागाच्यावतीने दि. ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी स्त्रियांचे आरोग्य आणि पोषण स्थिती' या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. शशिकांत यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने होणाऱ्या या शिबिरासाठी पुणे येथील चंद्रशेखर आगाशे, शारिरिकशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, प्राध्यापिका डॉ. श्रध्दा नाईक, हिंगोली वसमत येथील योगानंद स्वामी कला महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यपिका डॉ. वर्षा झंवर दोडिया, संगमनेर येथील प्रसिद्ध स्त्री -रोग तज्ज्ञ डॉ. विकास पाचोरे आदी मान्यवर सहभाग घेणार आहेत. प्रवरानगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कुलगुरू डॉ. नितीन कर्मळकर, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भगवंतराव खर्डे, डॉ. भास्करराव खर्डे, महासंचालक, डॉ. सर्जेराव निमसे, भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, यांच्या सहकार्याने महिला महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. चर्चासत्राच्या समन्वयक प्रा. जया डबारसे, प्रा. कांचन देशमुख, डॉ. अनुश्री खैरे, प्रा. मीनाक्षी वांडेकर, प्रा. राजश्री तांबे, प्रा. रुपाली नवले, प्रा. संजय वाणी आदींनी चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.