Breaking News

एका दहशतवाद्याचा खात्मा


दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्यानंतर जम्मू शहरात रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. या परिसरात सुरक्षा रक्षकांचा वेढाही वाढवण्यात आला असून दहशतवाद्यांविरोधात अद्यापही कारवाई सुरुच आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या कारवाईत 1 दहशतवादी ठार झाला असून आपला 1 जवानही जखमी झाला आहे. त्याचबरोबर शोध मोहिमेदरम्यान एका एके 47 रायफलसह इतर हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते आहे.