Breaking News

लष्करीतळावर दहशतवादी हल्ला दोन जवान शहीद; सुंजवान लष्करी कॅम्पवर हल्ला


श्रीनगर : जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाला असून एका मुलीसह दोघेजण जखमी झाले आहेत. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराचे अधिकारी एस. डी. सिंग जमवाल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पहाटे 4.55 च्या सुमारास संशयास्पद हालचाल दिसून आली आणि अचानक एका बंकरवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या संख्येबाबत अजून माहिती नाही. त्यांनी स्टाफ क्वार्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून यात एक हवालदार आणि त्याच्या मुलीचा समावेश आहे. अजूनही ऑपरेशन सुरू असल्याचे ते म्हणाले. 

लष्कराने ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून दहशतवाद्यांनी सुंजवान लष्करी कॅम्पवर गोळीबार सुरु केला आहे. या गोळीबारात 3-4 जवान जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, कॅम्पमध्ये दहशतवादी आणि लष्कर यांच्यात अद्याप चकमक सुरुच आहे. तर, दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराला अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये 3 ते 4 दहशतवादी घुसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत असून लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.