Breaking News

शेवगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निकालाचा संमिश्र कौल


शेवगाव - शेवगाव तालुक्यातील चौथ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडल्या. शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल हा राजकीय अभ्यासकांच्या अपेक्षांना छेद देणारा लागल्याने राजकीय नेत्यांना या निकालाने अनेक चढ-उतार भविष्यातील निवडणुकांवर होतील असे अशी चर्चा चौका चौकात सध्या रंगत आहे. निकालाची सरासरी पाहता कोणत्याही पक्षाला ठाम असे मत मिळालेले नाही. तालुक्यातील उमेदवारांना पडलेल्या मतांची बेरीज पाहता आगामी निवडणुकांचे लक्ष विचलित करणारी ठरत आहे. तालुक्यामध्ये जनशक्ती मंचाला एक ग्रामपंचायत मिळवण्यात जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांना यश आले आहे. तर तालुक्यातील पराभूत झालेल्या उमेदवारांनाही चांगली मते मिळाल्याने भविष्यातील जनशक्तीचा जनाधार वाढल्याचे दिसत आहे.

शेवगाव तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या लाडजळगाव ग्रामपंचायतीमध्ये निकालाची परंपरा खंडीत करत सरपंच पदाचे उमेदवार लता काकासाहेब तहकीक यांनी अर्चना वसंत वीर यांच्यावर 2259 मतांनी मात केली. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या विचाराला नागरिकांनी पराभूत करून तालुक्यातील लाडजळगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला.. तर स्वयंभू गणपती देवस्थान आव्हाने येथील ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे कायम राहिली .धोंड्याला माहेरी आलेल्या एका लेकीने माहेरच्या मंडळीला आपल्या एका मताने सरपंच पद दिल्याने खडका गाव मध्ये सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
तालुक्यामध्ये विविध कामे खेचून आणणार्‍या वडुले शेवगाव ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागल्याने अनेकांच्या अंगावरील खादी उतरण्याची वेळ आली आहे . शेवगाव तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या माजी सरचिटणीसला मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. भाजपाला मताचा टक्का जोडण्यात यश आल्याचे दिसत आहे तरी अनेक जागेवरती राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज आहे.

ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

लाडजळगाव - लता काकासाहेब तहकिक 1221, अर्चना वसंत वीर 1029, सीमा अंबादास ढाकणे 782, लता प्रकाश राठोड 86
वडुले बु. - प्रतीप नानासाहे काळे 1207, भीमराज हरिभाऊ सागडे 835, हरिभाऊ दादा काळे 310.3
बर्‍हाणपूर - सुभाष सुखदेव वाणी 248, रमेश मोहन दिवटे 221
मडके - वृषाली सोमनाथ भिसे 377, मीराबाई मदन वडघणे 365, रुपाली सुरेश भवार 9
गोळेगाव- विजय सोन्याबापू साळवे 870, बाळू बाबू वावरे 419
लोळेगाव- बाबासाहेब मुरलीधर पठाडे 191, एकनाथ भिवसेन शिनगारे 167, भानुदास नारायण काळे 167
दिवटे - दत्तू सीताराम जाधव 320, मनीषा लक्ष्मण कव्हळे 304, सुभाष तात्यासाहेब कणसे 07
खडके - संतोष लक्ष्मण नागरे 181, नारायण बन्सी पाखरे 180, बद्रीनारायण नागोराव कर्हे 125, रामकिसन भीमराव पाखरे 92, रमेश नवनाथ केदार 19
आव्हाने - संगीता प्रकाश कोळगे 1096, अर्चना कचरू चोथे 1075, लाड
सामनगाव - प्रतिभा संजय खरड 608, सारिका नितीन सातपुते 563, आशा हरिभाऊ काळे 81