Breaking News

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे पगारात भागवा कार्यशाळेचे आयोजन


 नाशिक /प्रतिनिधी। 4 -  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नाशिक जिल्हा समन्वय समितीतर्फे 5 जानेवारी 2016 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात पगारात भागवा अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यशाळेस जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग.दी.कुलथे, अध्यक्ष मनोहर पोकळे आणि सरचिटणिस समीर भाटकर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सेवा हमी कायदा, पगारात भागवा अभियानासोबत जिल्हा समन्वय समितीची पुनर्गठन, सातवा वेतन आयोग आणि राजपत्रित अधिकार्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 27 ऑगस्ट 2015 च्या परिपत्रकान्वये कार्यशाळेसाठी दुपारी 1.30 नंतर उपस्थित राहण्याबाबत अधिकार्‍यांना परवानगी देण्यात आली आहे. राजपत्रित अधिकार्‍यांनी कार्यशाळेस उपस्थित राहवे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष रामदास खेडकर आणि सहसंचालक लेखा व कोषागरे तथा सरचिटणीस बाळासाहेब घोरपडे यांनी केले आहे.