Breaking News

81 वर्षीय रुग्णांवर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

 नाशिक/प्रतिनिधी। 23 - नव्यानेच रुग्णसेवला प्रारंभ केलेल्या नेपच्यून हॉस्पीटलमध्ये पहिलीच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने वैद्यकिय पथकासह हॉस्पीटल कर्मचार्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 
मुंबई आग्रा महामार्गालगत कन्नमवार पुलाजवळ नेपच्यून 1 सुपर स्पेशलिस्ट हॉस्पीटल नुकतेच रूग्ण सेवेत रूजू झाले आहे. रूग्णसेवेला प्रारंभ केल्यानंतर गुडघा प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. जवळपास सहा तासांच्या प्रयत्नांनी अस्थिरोगतज्ञ डॉ. स्वप्नील महाले, भुलतज्ञ डॉ. मुकेश खैरनार यांच्यासह स्टाफने हे आव्हान लिलया पार पाडले आहे. 81 वर्षीय विनायक देशमुख यांना आपल्या पायावर उभे करून जगण्याची उमेद दिली.
नेपच्युन 1 या हॉस्पिटलने प्रत्येक नाशिककरांचा विश्‍वास जतन करण्याची हमी घेतली आहे आणि त्या दृष्टीने नेपच्युन परिवाराने प्रारंभ केला असून 100 बेड्सच्या या प्रशस्त रूग्णालयात सर्व सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसेच वैद्यकिय व्यवसायातील नामवंत 53 तज्ञ डॉक्टरांचा समावेश नेपच्युनमध्ये आहे. विविध स्तरातील गरजू रुग्णांच्या आजारांवर परवडणार्‍या सर्व समावेशक दरात वैद्यकिय उपचार पुरविण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणासहित सर्वोत्कृष्ट उपचार पुरवण्याचा आमचा मानस असून लवकरच नेपच्युन 1 मध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधांसह शासकीय योजना देखील सुरू होणार आहेत. 
गरजू रुग्णांनी संकोच न बाळगता आणिबाणीच्या प्रसंगी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील सेंटर हेड रझमी फारूकी, श्री. मतीन खान यांच्या वतीने करण्यात येत आहे.