श्रीरामपूर / प्रतिनिधी ;- येथील बोरावके महाविद्यालयाच्या गेटजवळ एका तरुणीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मछिंद्र हनुमंत पारखे {रा. कुरणपूर} असे आरोपीचे नाव आहे. पारखे याने बोरावके महाविद्यलायच्या गेटजवळ एका ३० वर्षीय तरुणीशी असे वर्तन केले. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार मछिंद्र पारखेविरुद्ध कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक उघडे करीत आहेत.
तरुणीचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:59
Rating: 5