Breaking News

तालुक्यात दिड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाअभावी शिल्लक ; हळगाव कारखाना ऊस घेईना स्वाभिमानी संघटना, युवक काँग्रेस कडून आंदोलनाचा इशारा


जामखेड /ता. प्रतिनिधी ।  मागील वर्षी चांगला पाऊस व जलसंधारणाच्या कामामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोडक्ट्स या खाजगी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना किचकट अटी घालून केवळ चाळीस हजार मेट्रिक टन ऊस घेण्याबाबत करार केला. गाळपाअभावी शिल्लक ऊसाचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याने स्वाभिमानी संघटना व तालुका युवक काँग्रेस ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तालुक्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तसेच जलसंधारण कामामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. ऊसाला असणारा हमी भाव यामुळे शेतकर्‍यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. साखर कारखान्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ऊस कोणताही कारखाना घेईल या भ्रमात ऊस उत्पादक शेतकरी होते. परंतु आदीनाथ (करमाळा), जय श्रीराम शुगर (हळगाव), भैरवनाथ शुगर (परांडा) या कारखान्याच्या टोळ्या ठराविक भागातील ऊस घेत आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जत, श्रीगोंदा व हळगाव येथील कारखान्याकडे जाऊन ऊस घेण्याची विनवणी करीत आहेत. मात्र त्यांचा ऊस घेण्यास कोणी तयार होत नसल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सांगत आहेत,