Breaking News

अंत्यविधीची तिरडीरुपी कीट सर्व साहित्यसह बाजारात


शिर्डी/(किशोर पाटणी) जन्म आणि मृत्यू अटळ असला तरी कधी कोणाला मृत्यू येईल हे सांगता येत नाही मात्र अशी घटना झाल्यावर मोठी धावपळ होत असते अशा वेळी अंतिमसंस्कार करण्यासाठी ग्रामीण भागात शेजारी पाजारी व नातेवाई हे काम सहजपणे करून टाकतात मात्र कमी होत असलेली कुटुंब व्यवस्था व मोठ्या शहरात अशा वेळी मोठ्या अडचणी येतात महानगरात अशा कामासाठी फारसा वेळ नसतो अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी जगातील पहिली अंतिमसंस्कार किट बाजारात असली असून यात अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य यात उपलब्ध असल्याची माहिती या कंपनीचे प्रतिनिधी अविनाश वानरे यांनी दिली

या कीटमध्ये स्ट्रेचर टीपोय पांढरे कापड शाल चटई पुष्पहार दोन माठ दिवा कपूर अगरबत्ती गोमुत्र गुलाबजल गंगाजल तांदूळ कुंकू हळद गुलाल चंदन पावडर गौरी चंदनाचे लाकूड सुतळी जानवे पांढरा दोरा मुरमुरे काडीपेटी सुपारी ब्लेड महिला असेल तर ओटी भरण्याचे साहित्य बांबूची सीडी ही कीट सुवर्ण पूजा नावाने बाजारपेठेत आली आहे दीडशे किलो वजनाचा पुरुष किंवा महिला सहजपणे उचलू शकतो अशी ही तिरडी (कीटमध्ये व्यवस्था आहे) भारतीय संस्कृतीकडे लक्ष देऊन व अभ्यास करून ३५ पेक्षा अधिक साहित्य देऊन ही तिरडी रुपी कीट आता पुणे आणि मुंबई उपलब्ध झाली आहे नगर जिल्ह्यात लवकरच उपलब्ध होणार असून अंधेरी येथे तिचे निर्मिती केली जाते नगर नंतर नगर आणि औरंगाबाद व मराठवाडा या भागात ही कीट विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे या कीटची अंदाजे किंमत ३ हजाराच्या आसपास असणार असून कंपनीने त्याचे पेंटेट सुद्धा घेतले आहे नवीनच तिरडीरुपी सर्वपूजा कीट लोकांच्या कसोटीला उतरेल असे अविनाश वानरे यांनी सांगितले