Breaking News

लायनेस क्लब आयोजित लावणी महोत्सव संपन्न महोत्सवातून जमा झालेला पैसे पारधी समाजाच्या शिक्षणासाठी वापरणार


अहमदनगर (प्रतिनिधी)- लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने माऊली सभागृहात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्राची लोककला असलेल्या मराठमोळी लावणीचे खास महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व पुरस्कार विजेत्या तथा युवा लावणीसम्राज्ञी पुजा पाटील, पुनम कुडाळकर, सुनिता कळमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी ढोलकीच्या तालावर बहारदार लावणीचा नजराणा पेश केला.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायनेस क्लबच्या महिलांनी या लावणी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून जमा झालेले पैसे श्रीगोंदा तालुक्यातील बाबा आमटे वसतीगृहात शिक्षण घेत असलेल्या पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहेत. यावसतीगृहात शिकत असलेल्या सत्तर पारधी समाजातील मुलांना लायनेस क्लबनी दत्तक घेतले आहे. प्रारंभी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या मुख्य प्रायोजिका पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नटराज पूजन होवून दीपप्रज्वलनाने लावणी महोत्सवाचे उद्घाटन झाले.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर सुरेखा कदम व डिस्ट्रिक्ट प्रांतपाल डॉ.वर्षा झंवर उपस्थित होत्या.

या महोत्सवासाठी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भुतकर, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका शीतल जगताप, छायाताई फिरोदिया, माजी महापौर अभिषेक कळमकर, पुजा शिंदे, नम्रता सत्रे, उषाताई नलवडे, नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे, सुरेश वाबळे,शिवाजी कपाळे, सुरेश चव्हाण, आप्पासाहेब होले, संदीप पिसाळ, कुंदन दिवाणे, डॉ.सोनाली मोटे, अब्रार शेख, प्रसाद मांढरे, डॉ.समर रणसिंग, सविता मोरे,आदी उपस्थित होते.