Breaking News

प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात शिवाजी महाराज बसले पाहीजे-गणेश ठोकळ


कोपरगाव ता.प्रतिनिधी दि.२१राजे शिवनेरी किल्यावर जन्माला आले,त्यांचे देहावसान रायगडावर झाले.त्या दोनही किल्ल्यांची सुरुवातीच्या दोन अक्षरांनी शिवराय बनले.या नावातच जन्मापासुन मृत्यूपर्यंतचा राजांचा इतिहास आहे.राजांना धर्म ,जात,पक्ष नव्हता केवळ हिंदवी स्वराज्याचा ध्यास होता.आई बहीणींडे कुणाची वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करत नव्हता असा राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरातील देवघरात बसला पाहीजे असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक गणेश ठोकळ यांनी केले.
शिवजयंतीत्सोव निमित्ताने तालुक्यातील पढेगांव येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी त्यांचे समवेत गुरुदासजी लोंढे,रवी राऊत,सुनील धात्रक,अक्षयजी राठोड,बगळेसर आदी इतिहासतज्ञ उपस्थित होते.

पुढे ठोकळ म्हणाले,शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याचा परिणाम संपुर्ण राज्यानं बघितला.शिवजयंती साजरी करुन राजांचे विचार आत्मसात करा.जोपर्यत कुटुंबातले विचार बदलत नाही.एकमेकांबद्दल व्देषभावना कमी होत नाही.आई आणि पोराची चुल वेगळी पेटते तोपर्यंत जयंतीत्सोव थोतांड आहे.हिंदवी स्वराज्य ऐऱ्या गैऱ्यांचे नाही.कोपर्डीसारखा प्रकार या महाराष्ट्रात घडतो.हे दुर्दैव आहे.आईला आई आणि बाईला बाई प्रत्येकानं म्हटलं तरी अशे प्रकार कमी झाल्याचं समाधान माझ्या राजाला वाटल्याशिवाय राहणार नाही.महारांजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब म्हणाला ज्याचा सदोतिस वर्ष पाठलाग केला तो कधीच हाताला लागला नाही.अय अल्ला या महापुरुषासाठी तुझा दरवाजा खुला कर.

याबरोबरच प्रत्येक आईने मुलांना संस्काराचे धडे देऊन आदर्श पिढी घडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. कारण,आईने ठरवले तरी ती काहीही करु शकते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कहांडळसरांनी केले.