आदिवासी भिल्ल समाजाचा भव्य उत्साहात मेळावा
यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, आदिवासी भिल्ल समाजाने संघटीत होवून शिक्षण व विविध योजनांच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आले पाहिजे. आपला विकास आपणच केला पाहिजे यासाठी सतत अडचणीवर मात केली पाहिजे. आपले रेशनकार्ड, जातीचे दाखले, वृध्दपकाळ अर्थ सहाय्य प्रकरणे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून काढून देण्यासाठी विशेष मदत करण्यात येईल. एकलव्य व द्रोणाचार्य यांच्या पासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले.
रेवणनाथ जाधव म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात एकमेव आ. बाळासाहेब थोरात हे आदिवासी समाजाची सेवा करतात. अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात देतात. प्रत्येकाला रोजगार मिळावा यासाठी काजळी घेतात. अजून ही मोठ्या प्रमाणात भिल्ल आदिवासी समाज केंद्र व राय सरकारच्या योजनांपासून वंचित आहेत. त्यांनी संघटीत होवून योजनांचा फायदा घ्यावा असे अवाहन त्यांनी केले.
प्रा. बाबा खरात म्हणाले की, एकलव्य जयंतीच्या माध्यमातून आदिवासी भिल्ल समाज बांधवासाठी हा विचारांचा जागर आयोजित केला आहे. आदिवासी हा जंगलाचा राजा आहे. त्याला सर्व सोयी, सवलती, संरक्षण मिळाले पाहिजे. भिल्ल समाजाने अडचणींना संकटे समजु नका, अडचणीच माणसांना जगण्याचे बळ देत असतात. पोटाला चिमटा घ्या पण मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहात उच्च पदस्य अधिकारी बनण्याचे डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करा. भविष्यात महिला बचत गट, आदिवासी नाईक, समाज स्वत:ची वीटभट्टी, आदिवासी युवकांसाठी कैशल्यावर आधारित उपक्रम, गवंडी काम, सेंट्रींगची कामे यावर आधार रोजगार प्रशिक्षण आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बाबा ओहळ, नवनाथ अरगडे यांची ही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बंटी यादव यांनी केले तर आभार रमेश खैरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पी. वाय. दिघे, राजेंद्र थोरात, दिपक बारे, संतु पवार, शुभम पिंपळे, भास्कर बर्डे, निशिकांत बर्डे, गोरख पिंपळे, दत्तु पवार, शुभम बर्डे, शांताराम बर्डे, सखाराम बर्डे, सखाराम माळी, नवनाथ माळी, बाळासाहेब काकड यांनी विशेष परिश्रम घेतले.