सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर शाखेच्या प्रथम आणि तृतीय सत्राचे निकाल जाहीर झाले आहेत. प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ यांनी दिली. या महाविद्यालयातील पदुत्तर विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील फार्माकेमेस्ट्री आणि कॉलीटी आशुरन्स टेक्नॉलॉजी फार्माकोग्नसी या विषयाचे सर्वच विद्याथी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्रथम व द्वितीय अभ्यासक्रमातील फार्माकेमेस्ट्री आणि कॉलीटी आशुरन्स टेक्नॉलॉजी फार्माकोग्नसी या विषयाचे १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह आणि ३९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ज्योती जगनाथ विखे, अर्चना खंडू शेळके, प्रियांका रामराव वराडे, अनिकेत वसंत देवडे, अनिता राजेंद्र दळे, अश्विनी विलास जोशी आदींचा समावेश आहे. या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी अभिनंदन केले.
‘प्रवरा’ने राखली निकालाची परंपरा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:24
Rating: 5