Breaking News

महापालिकेच्या स्थायी समितीतून आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर


पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतून आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले आहेत. या सदस्यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. या समितीची मुदत संपण्याअगोदर येत्या बुधवारी (दि.28) अखेरची स्थायी समितीची सभा होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर सुमारे 550 कोटी रुपयांचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, रस्ते विकसित करणे, रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे विषय आहेत. दरम्यान, ही स्थायी समिती आजवरच्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांचे विकास कामांना मंजुरी देण्याचे ’रेकॉर्ड’ तोडणारी ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत ’वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी 208.36 कोटी रुपये खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत च-होली येथे 1 हजार 442 सदनिका बांधण्यात येणार आहेत. याचे काम मन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लि. कंपनीला देण्यात येणार असून त्यांना 132 कोटी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. रावेत येथे 934 सदनिका बांधण्यात येणार आहेत. हे काम मन. इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लि. कंपनीला देण्यात येणार असून त्यांना 88 कोटी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचे काम एस.अ‍ॅण्ड जे विल्डकॉन प्रा. लि यांना देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना 18 क ोटी 41 लाख रुपये देण्यात येणार आहेत. दापोडी पूल ते तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौकापर्यंतच्या 18 मीटर रुंद रस्त्याचे अद्यावत पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 18 कोटी 26 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. अग्निशामक विभागाकरिता तीन फायर कॅनन टॉवर व्हेईकल वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी आठ कोटी 14 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस रस्त्यावर गोविंद गार्डन चौक येथे सबवे बांधण्यात येणार असून त्यासाठी नऊ कोटी 29 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. वायसीएम रुग्णालय येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण, डा ॅक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटी 47 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.