मराठ्यांनी मराठी भाषेसाठीही लढण्याची नितांत गरज.
आरक्षणासाठी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकवटला ही चांगली गोष्ट आहे.पण एक मराठा लाख मराठाचे घोषवाक्य घेऊन लढणाऱ्या मराठ्यांनी मराठी भाषेसाठीही लढण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन रामायनाचार्या साध्वी सर्वेश्वरी दीदी यांनी केले.
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने आयोजीत तुकाराम बीजोत्सवानिमित्त शनिवार पासून सुरु झालेल्या तुलसी रामायण कथेच्या पूर्वार्धात बोलताना दीदी म्हणाल्या, मराठीचा अभिमान फक्त बोलण्यापूरता बाळगून चालणार नाही.आमची मुले इंग्रजी शाळेत शिकावीत म्हणून प्रत्येकाची धडपड सुरू आहे.इंग्रजी हि काळाची गरज असली तरी ती भाषा आपली नाही.मराठी ही आपली भाषा असून ती टिकवून ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे.आम्ही घरात मुलांना आई,बाबा म्हणायला शिकवण्याऐवजी मम्मी-पप्पा म्हणायला शिकवतो.मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे.या भाषेत गोडवा आणि प्रेम आहे.आपल्याला सुसंस्कारित पिढी घडवायची असेल तर मुलांना मराठीचे पायाभूत ज्ञान दिलेच पाहिजे.प्रत्येक मराठा कुटुंबाने आल्यापासून याची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांचा आरक्षणासाठीचा आक्रोश योग्यच आहे.समाजातील सर्वच आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळाले तर प्रगती करून मुख्य प्रवाहात येऊ शकतील. एकवटलेल्या मराठ्यांनी आरक्षणाच्या लढ्याबरोबरच मराठीभाषेसाठीही लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.