Breaking News

नितीन बानगुडे यांचे आज व्याख्यान


कोेपरगांव : शहर प्रतिनिधी ;- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांचे शहरातील मुख्य रस्त्यावरील अश्वारूढ शिवाजी पुतळयासमोर व्याख्यान होणार आहे. {दि. २१} सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. ते म्हणाले, की शिवरायांची आदर्श शिकवण तरुरूणाईमध्ये जागरूकता निर्माण करते. शिवरायांच्या समग्र जीवन कार्याची तरुणाईला माहिती व्हावी, या उद्देशाने प्रा. बानगुडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिवरायांचे चरित्र जाणून घ्यावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.