Breaking News

परवानगी नसतानाही मिरवणूक काढल्याने भाजप आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे

नाशिक, दि. 21, फेब्रुवारी - परवानगी नसतानाही शिवाजी महाराज मानवंदना सोहळ्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी आ. अपूर्व हिरे यांच्यासह आयोजकांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. अपूर्व हिरे, भाजपचे सुनील बागुल, छावाचे करण गायकर, सुरेश बाबा पाटील, चंद्रकांत बनकर, शिवाजी सहाणे व इतर अशा सुमारे 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.


सकल मराठा समाज शिवजयंती उत्सव समितीच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवाजी महाराजांना मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार व देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे शिवरायांना मानवंदना देण्यासाठी हजेरी लावली. यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन विविध पक्षांचे पदाधिकारी व सुमारे पन्नास हजार नागरिक उपस्थित होते. त्यांनी केलेल्या गगनभेदी शिवगर्जनेची ‘अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली.