Breaking News

सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश लटके

जामखेड /ता. प्रतिनिधी :- आखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी सातेफळ गामपंचायतीचे सरपंच गणेश आजीनाथ लटके यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र अहमदनगर जिल्हाध्यक्ष अजय काशीद यांनी दिले आहे.


यामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषद ही संघटना राजकारण विरहित काम करणारी असून त्यामुळे सर्व सरपंच या संघटनेत काम करु शकतात, सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी काम करणारी संघटना आहे. त्यामुळे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुडूँकर व राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या सुचनेवरून आपली निवड करण्यात आली अशा आशयाचे पत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अजय काशीद यांनी निवडी नंतर जामखेड तालुक्यातील सरपंचाचा मेळावा घेवून, त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जे सरपंच इच्छुक असतील त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अजय काशीद यांनी केले आहे. यावेळी गणेश जगताप, पिंपळगाव उंडा दादासाहेब दाताळ बाळगव्हान, संजय भोंडवे घोडेगाव हे सरपंच उपस्थित होते.