मालवण समुद्राचे पाणी झाले हिरवे
सिंधुदुर्गनगरी, दि. 03, फेब्रुवारी - मालवण किनारपट्टी भागातल समुद्राच पाणी हिरव्या रंगाचे दिसू लागले. दिवसा हिरव्या रंगाचे तर रात्री निळसर चमकदार पाणी असा निसर्गाचा अद्भुत नजारा मालवण समुद्रात पाहायला मिळतोय.
मालवण किनारपट्टी नजीकच्या समुद्राच्या पाण्याला मागील तीन दिवसांपासून गर्द हिरवा रंग आला आहे. तर रात्रीच्या वेळ उसळणार्या लाटा रंगीत स्वरूपात दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्याची हालचाल झाल्यानंतर नीळसर रंगाची झळाळी प्राप्त झाल्याचा नजारा पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बंदर जेटी समोरील समुद्रात नेहमी न दिसणारे मासे रात्रीच्या वेळी पाण्यात पोहत असताना पाण्याच्या होणार्या हालचालीमुळे पाणी चमकताना दिसून येत आहे. त्यामुळे माशांच्या हालचाली सहज टिपता येत आहेत.
मात्र येथील स्थानिक मच्छीमारांनी मात्र अशी स्थिती काही वर्षांनी उद्भवते अस सांगितले. या रंगीत पाण्याला स्थानिक मच्छिमार पाण्यात ’झारा’ आले असे म्हणतात.
शास्त्रीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही एक नैसर्गिक घटना आहे. ओहोटी आणि भरतीच्या प्रक्रियेदरम्यान पाण्याच्या ओढीच्या प्रभावाने समुद्र वनस्पती तसेच जलचरांच्या अंगी असलेला फॉस्फरस आणि इतर द्रव्ये पाण्यात मिसळतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी चमकताना दिसून येते. चार दिवसांपूर्वी किनारपट्टी भागात वार्यांचा वेग वाढला होता त्यावेळी समुद्राच्या पाण्यात जोरदार प्रवाह निर्माण झाले होते या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अशी स्थिती निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.