Breaking News

बालिकेवरील अत्याचाराचा तेली समाजातर्फे निषेध

नंदुरबार - नवापूर शहरात शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयातून बालवाडीत शिक्षण घेणारी पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करनार्‍याविरोधात मोर्चा काढण्यात आला. या नराधमाला कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी नवापूर शहर व तालुका तेली समाजाच्या वतीने निषेध नोंदवत तहसिलदार प्रमोद वसावे यांना निवेदन देण्यात आले. 


या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात समाजाने नराधमावर कठोर कारवाईच्या मागणीसह, ही घटना समाजाला काळीमा फासणारी असून, त्या घटनेचा तीव्र संताप समाजात व्यक्त होत आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, पोसा कायद्यातंर्गत तपास व्हावा, खटला अतिशिघ्र न्यायालयात चालवण्यात यावा, विषेश सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, पिडित मुलीला शासकिय धोरणानुसार तातडीने मदत देण्यात यावी, गून्हा दाखल झालेल्यांना अटक करण्यात यावी, मुलीच्या आई वडील यांच्यावर दबाव टाकणा-यांचा शोध घेण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.